Admission Enquiry
Loading Events

« All Events

  • This event has passed.

महाराष्ट्र राजभाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव

February 18 @ 8:00 am - 5:00 pm

महाराष्ट्र राजभाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अहवाल

एसेन्स इंटरनॅशनल शाळेत महाराष्ट्र राजभाषा दिन तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात “खरा तो एकचि धर्म” या प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी विचार मांडले.

कार्यक्रमात दिंडी सादर करण्यात आली तसेच मराठी गौरवगीताने वातावरण भारावून गेले. “शिवरायांचा राज्याभिषेक” हा देखावा अत्यंत आकर्षक व प्रभावी ठरला. विद्यार्थ्यांनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सर्वांच्या अंगावर रोमांच उभे करणारा होता. याशिवाय “महाराष्ट्राचे साडेतीन शक्तीपीठे” याविषयी माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सुंदर प्रदर्शनही भरविले. कार्यक्रमाची सांगता “पासायदान” या प्रार्थनेने झाली.

या कार्यक्रमासाठी सर्व मराठी व संस्कृत शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. सौ. अश्विनी माळवे, सौ. चंद्रज्योती चौधरी, सौ. सोनाली कोंडमलवार, सौ. अमृता वाहने, सौ. सारिका खाडे, सौ. रश्मी मिश्रा व सौ. ललिता नकाडे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. मराठी विभाग प्रमुख सौ. मृदुला पाटणे व सौ. मयुरा देवरस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

कला शिक्षक श्री. कपिल खोब्रागडे व सौ. अश्विनी भंडारकर यांनी सुंदर पार्श्वभूमी व सजावट तयार केली. संगीत शिक्षक सौ. हेमलता भेंडे, श्री. मनीष निलटकर व श्री. मनोज कुकवास यांनी गीतांसाठी विद्यार्थ्यांना उत्तम तयारी करून घेतली.

या कार्यक्रमासाठी शाळेचे संचालक श्री. विजय मेनन व डॉ. हेमा मेनन यांनी शुभेच्छा दिल्या. गुणवत्ता समन्वयक सौ. जयंश्री शास्त्री, प्राचार्या सौ. बीना मेनन, उपप्राचार्या सौ. अर्पणा विल्सन, सौ. शशिप्रभा सूर्यवंशी तसेच शैक्षणिक प्रमुख सौ. जनिशा मोहनराज यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने व आत्मीयतेने सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला व सर्वांनी मराठी भाषा व संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला.

Details

  • Date: February 18
  • Time:
    8:00 am - 5:00 pm
  • Event Category: